E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यात पाणी साचणारी २३० ठिकाणे
Wrutuja pandharpure
28 May 2025
२९ नव्या ठिकाणांची भर
पुणे
: शहरात पाणी साचणार्या ठिकाणांमध्ये वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा २९ ठिकाणांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील पाणी साचणार्या ठिकाणांची सख्या २३० वर पोहोचली आहे.
शहरात अनेक विकास कामे सुरु आहेत. मेट्रोच्या कामामुळे पावसाळी लाईन गेल्या वर्षी तुंबल्या होत्या. सिमेंट क्राँक्रीटचे रस्ते तयार केल्यामुळे पाणी वाहण्यासाठी मार्ग मिळत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे. यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुसळधार पावसानंतर रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त होत आहे. मागील वर्षीचा धडा घेत महापालिकेने पाणी साचणारी २०१ ठिकाणी निश्चित केली होती. त्यावर उपाय योजना केल्या जाणार होत्या. या उपाय योजना होण्यापूर्वीच शहरात आणखी २९ नवीन ठिकाणांचा समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे.
शहरात गेल्या वर्षी पावसाने कहर केला होता. रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. सखल भागात अनेक घरात पाणी शिरले होते. सिंहगड रस्ता परिसरातील काही भागाला आणि धानोरीतील काही वस्त्यांना पुराचा मोठा फटका बसला होता. याचा धडा घेत पालिकेने यंदा पावसाळीपूर्व कामे करण्याचे नियोजन केले होते. परंतु, प्रशासकीय दिरंगाई आणि ठेकेदारांच्या उदासीन कारभारामुळे अनेक कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. पावसाळीपूर्व कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले होते. परंतु, अवकाळी पावसाने कहर सुरु केल्यानंतर मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे.गेल्या आठवड्यापासून पावसाने उसंत घेतलेली नाही. त्यामुळे अर्धवट राहिलेली कामे आहे तशीच पडून राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील पाणी साचणार्या २०१ ठिकाणांची यादी तयार करून तेथे पाणी साचू नये, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असतानाच पहिल्याच पावसात पाणी साचणारी २९ नवीन ठिकाणे समोर आली. सर्वाधिक ठिकाणे ही झोन २ मधील असून यामध्ये औंध, बाणेर, शिवाजीनगर, कोथरूड या भागांचा समावेश आहे. त्यामुळे आता जुन्या ठिकाणांसह या नवीन ठिकाणांवर आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे.
शहरात दरवर्षी पावसाचे पाणी साचणार्या ठिकाणांची माहिती गोळा करून त्याची यादी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केली आहे. या ठिकाणी पाणी साठणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.
- पृथ्वीराज बी. पी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
Related
Articles
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
फिरकीपटू पीयूष चावला निवृत्त
07 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात युवा क्रिकेटपटूंचे पदार्पण
31 May 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
पाणीपुरवठ्यावर पालिकेचा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
05 Jun 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
फिरकीपटू पीयूष चावला निवृत्त
07 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात युवा क्रिकेटपटूंचे पदार्पण
31 May 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
पाणीपुरवठ्यावर पालिकेचा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
05 Jun 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
फिरकीपटू पीयूष चावला निवृत्त
07 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात युवा क्रिकेटपटूंचे पदार्पण
31 May 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
पाणीपुरवठ्यावर पालिकेचा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
05 Jun 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
फिरकीपटू पीयूष चावला निवृत्त
07 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात युवा क्रिकेटपटूंचे पदार्पण
31 May 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
पाणीपुरवठ्यावर पालिकेचा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर